Share

राठोडांनंतर भरणेंनीही दाखवली मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली !

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : वनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारी रोजी वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. तेंव्हा कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

त्यामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. ‘पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरणावरून कारवाई झाली नाही. किमान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरी राठोड यांच्यावर कारवाई केली जावी’, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमल्याने सरकारवर टीकेची झोड उठवली गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाला वनमंत्री भिक घालत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच आणखी एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे.

राज्यात कोरोना थैमान घालत असतानाच राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवेढा येथे विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याचा घाट घातला होता. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी दिसून आली. संजय राठोड यांच्यानंतर दत्तात्रय भरणे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला हरताळ फासल्याचे दिसून आले.

https://www.facebook.com/bharanemamaNCP/posts/1887924894706885

एकीकडे राज्यातील सर्व नेत्यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच नेत्याने कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत उद्घाटन सोहळ्यांचा सपाटा लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!