Share

कोरोना आपल्यासाठी नवीन नाही मात्र, नियम पाळा-मनपा आयुक्तांची विनंती

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मागील काही दिवसांमध्ये शहरातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. जसजसा पॉझीटीव्हीटी रेट वाढत आहे. तसतसे आपण टेस्टिंगची संख्या वाढवत आहोत. मात्र पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर मास्क घालणे , शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना शहरातील नागरिकांना नियम पाळण्याची विनंती केली आहे.

सध्या महापालिकेद्वारे सुरु असलेल्या उपाययोजनांबद्दलमाहिती दिली. ते म्हणाले , ‘सध्या आपण शाळा,कोचिंग क्लासेस बंद केले आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर आपण कारवाई करत आहोत. गर्दीच्या ठिकाणी आपण कोरोना तपासणी करत आहोत. कोविड सेंटर वाढवत आहोत. ऑक्सिजनची तयारी देखील सुरु आहे.

कोरोना हा आता आपल्यासाठी नवीन नाही. २०२० मध्ये आपण खूप वाइट परिस्थिती अनुभवली. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आपण आता पूर्ण तयारी केलेली आहे. ऑक्सिजनची कमी पडणार नाही. आता रुग्णसंख्या अचानकच वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे’.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!