Share

हिंमत असेल तर अमेय खोपकरना अटक करून दाखवाच; मनसेचं आव्हान

Published On: 

मुंबई : मराठी भाषेच्या वापरासाठी आजही आंदोलने करावे लागतात हे ही सत्य आहे. काही दिवसांपूर्वीच अमेझॉन ऍप व वेबसाईट वर मराठी भाषेचा पर्याय देण्यात यावा यासाठी मनसेने आंदोलन केले होते. उद्या २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन ! विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला देदीप्यमान इतिहास रचणाऱ्या थोर व्यक्तींचा परीस स्पर्श लाभला आहे.

यामुळेच मराठी भाषेसाठी आग्रही असलेल्या मनसेने कोरोनाचे सर्व नियम पाळत ‘मराठी स्वाक्षरी’ मोहिमेचे आयोजन केले होते. मनसेच्या या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करणारच असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी, ‘वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे हजारोंचा जनसमुदाय जमवला, मात्र राठोडांवर काहीही कारवाई का केली नाही ? ‘ असा सवाल केला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी अमेय खोपकर यांना नोटीस देखील बजावली आहे. यामुळे, मनसे अधिक आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यक्रम घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांच्या कारवाईला मनसेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. यावरून, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी थेट सरकारलाच आव्हान दिलं आहे. ‘हिंमत असेल तर अमेय खोपकरना अटक करून दाखवाच,’ असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!