Share

करीना कपूर नंतर आलिया भट्टही दिसणार सितेच्या भूमिकेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अलौकीक देसाईच्या ‘सीता-द इनकार्नेशन’ या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरला ‘सीता’ हे पात्र साकारायची संधी मिळाली आहे. आता आलिया भट्टही सीतेची भूमिका करताना दिसणार आहे. मात्र आलिया साकारत असलेले सीता हे पात्र रामायणातील नाही. तर दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या महत्वकांक्षी ‘आरआरआऱ’ या चित्रपटातील पात्र आहे.

आलिया भट्ट ‘आरआरआर’ या चित्रपटाद्वारे ही दक्षिणेतील चित्रपट सृष्टीत पदार्पन करत आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट लवकरच सीतेची भूमिका साकारणार आहे. नुकतीच आलिया हैदराबादलाही जाऊन तिने दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांची खास भेट घेतली. या चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे. या चित्रपटातील आलिया भट्टचा पहिला लूक १५ मार्च रोजी अर्थात आलिया भट्टच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे.

ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा ‘बाहुबली’ हा चित्रपट खुप गाजला होता. बॉक्स ऑफीसवरही या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. यानंतर आता ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स अर्थात ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेता राम चरण या पीरियड ड्रामामध्ये प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!