🕒 1 min read
मुंबई: सध्या संपूर्ण राज्यभरात सध्या एका पोलीस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणी भाजपने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली होती. ठाकरे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, फडणवीस यांनी विधिमंडळात याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. मला समजत नाही की अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यानंतर शनिवारी ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होत. याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा संपूर्ण उहापोह करत आजच्या सामनातून शिवसेनेने विरोधी पक्ष भाजप या प्रकरणात घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला आहे.
‘मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळय़ात मोठे यश. बुधवारी दुपारी सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले व म्हणाले, ”पुढच्या तीन महिन्यांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ.” हा फाजील आत्मविश्वास आहे, सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा म्हणजे पुन्हा पहाटे किंवा मध्यरात्रीच्या शपथविधीची तयारी. त्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल तर भारतीय जनता पक्ष आपली उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल. . अशी टीका आजच्या सामना च्या रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


