🕒 1 min read
मुंबई : जगाच्या पाठीवर बॉक्स ऑफीसवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गेली अनेक वर्षे जेम्स कॅमेरुन यांचा ‘अवतार’ पहिल्या स्थानावर होता. मात्र २ वर्षापुर्वी मार्वल स्टुडीओच्या ‘अव्हेंजर द एन्ड गेम’ या चित्रपटाने अवतारचा विक्रम मोडीत काढत पहिले स्थान पटकावले होते. मात्र कोरोना संसर्गानंतर ‘अवतार’ पुन्हा प्रदर्शित झाला आणि आपले पहिले स्थान पुन्हा पटकावले.
२०१० मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी परकीय ग्रहावरील संशोधनासाठी गेलेल्या पथकावर आधारीत ‘अवतार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. हा चित्रपट इतका तुफान चालला की त्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा दुसरा चित्रपट ‘टायटॅनिक’ चा सर्वोच्च कमाईचा विक्रम मोडीत काढला. यांनतर जवळपास आठ-नऊ वर्षे अवतार पहिल्या स्थानावर विराजमान होता. मात्र मार्वल स्टुडीओच्या ‘अव्हेंजर द एंड गेम’ या चित्रपटाने अवतार च्या कमाईचा विक्रम मोडीत काढला.
https://twitter.com/Russo_Brothers/status/1370790032114479104?s=08
यानंतर २०१९ मध्ये जागतिक बॉक्स ऑफीसवर कमाईच्या बाबतीत सर्वाधिक कमाईच्या बाबतीत ‘अव्हेंजर द एंड गेम’ हा चित्रपट पहिल्या स्थानावर विराजमान झाला. वर्षभरातच कोरोना संसर्गामुळे बऱ्याच कालावधीसाठी चित्रपट गृहे बंद होती. मात्र आता दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी अवतार चीन मध्ये पुन्हा प्रदर्शित केला आहे आणि आपले पहिले स्थान पुन्हा पटकावले. अवतार चित्रपटाने पहिले स्थान पुन्हा मिळवल्याबद्दल ‘अव्हेंजर द एन्ड गेम’च्या दिग्दर्शकाने अवतारच्या अभिनंदनाचे टिवट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- देव कधी निवृत्ती घेत नसतो ; सचिनचे मैदानातील शॉट पाहून भारावले क्रिकेटप्रेमी
- उत्तराखंड पोलिसांनी कोहलीबाबतचे ‘ते’ ट्विट केले डिलीट
- कन्नड मध्ये १५३ दात्यांचे रक्तदान
- तब्बल 13 तासांच्या चौकशी नंतर सचिन वाझेंना एनआयएकडून अटक
- आज भारत-इंग्लंड दुसरा टी-२० सामना ; टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

