🕒 1 min read
औरंगाबाद : अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात वीज बिल थकबाकीवरून चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांच्या भूमिकेने थेट वीज कनेक्शन तोडण्यावर सरकारने आदेश काढले. परंतु काही शेतकरी ग्राहकांनी आपली थकबाकी भरण्यासाठी थेट महावितरण गाठले, त्यांना प्रोत्साहन म्हणून महावितरणने देखील त्यांचा सत्कार केला.
थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन वीज वितरण कंपनीकडून केले जात असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत पिशोर येथील रहिवासी शिवगिर गिरी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या कडील बाकी असलेले सर्व बिल भरले.
त्यामुळे महावितरणने त्यांचा गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. तसेच वीजबिल बाकी असलेल्या सर्व ग्राहकांनीसुध्दा बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पिशोर येथील उपकार्यकारी अभियंता एस.पी.परदेशी, शाखा अभियंता पी.एम.पिंपळकर, आर.आर.घुगे, सतिष मुरमुडे, इंदारचंद जाधव, दळवी आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


