Share

मार्वलच्या भारतीय फॅन्ससाठी मोठी खुशखबर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतात हॉलीवूड चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग खुप मोठ्या प्रमाणावर आहे. यात मार्वल स्टुडीओचा चाहता वर्ग हा खुप मोठा आहे. या चाहत्यामुळेच मार्वल स्टुडीओचे चित्रपट हे इतर हॉलीवूड चित्रपटापेक्षा जास्त यशस्वी होतात. मार्वल स्टूडीओने आता अव्हेंजर चित्रपटातील पात्रांवर आधारित वेब सीरीज प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय प्रेक्षकवर्ग पाहता मार्वल स्टूडीओने भारतातील हॉटस्टार व्हिआयपी या ओटीटी कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मार्वल स्टुडीओच्या वेब सिरीज या भारतात हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचा एक भाग म्हणून मार्वल स्टूडीओची पहिली वेब सिरीज ‘वांडा-व्हिजन’ वेब सीरीज या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात आली होती.

मात्र ही सीरीज भारतीय प्रादेशीक भाषामध्ये प्रदर्शित न केल्यामुळे भारतीय चाहते नाराज झाले होते. भारतीय प्रेक्षकांची ही नाराजी लक्षात घेऊन मार्वल स्टुडीओने मार्च महिन्यात येणारी ‘द फैल्कन एंड विंटर सोल्जर’ ही वेब सीरीज हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मार्वल स्टुडीओच्या भारतीय टिवटर हँडलने टिवट केले आहे. फैल्कन आणि विंटर सोल्जर हे दोघे अव्हेंजर या चित्रपटातील मुख्य पात्रांपैकी एक आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!