Share

हार्दिक-अश्विन नंतर आता महिला क्रिकेट टीम देखील थिरकली ‘या’ गाण्यावर

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : लखनऊ येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने चांगल्या गोलदांजीचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेचा डाव १५७ धावांवर गुंडाळला. यानंतर भारतीय फलंदाज स्मृती मानधना आणि पूनम राऊत या दोघींच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं ९ विकेट्स व १२८ चेंडू राखून सामना जिंकला. भारतानं २८.४ षटकांत १ बाद १६० धावा करून सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यातून परतला आणि 9 गडी राखून विजयी झाला. विजयानंतर खेळाडूंनी तामिळ सुपरस्टार विजयच्या चित्रपटाच्या ‘मास्टर’ गाण्यावर नृत्य केले. वेद कृष्णमूर्ती, आकांक्षा कोहली, व्हीआर वनिता, ममता माबेन यांचे हे नृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे नृत्य शेअर केले आहे.

तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जिमच्या व्यायामाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये ‘चायनामन’ कुलदीप यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या अश्विनसमवेत ‘मास्टर’ गाण्यावर नाचत होते.

https://www.instagram.com/p/CMMy2-NJtqT/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!