मुंबई : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चार अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केले होते. त्यामुळे राणेंना अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंशी फोनवरून संवाद साधला. या संवादात ‘भाजपा तुमच्या पाठीशी आहे’, अशी ग्वाही फडणवीसांनी दिल्याचे समजतेय.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे पुणे, रायगड, नाशिक या ठिकाणी पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नारायण राणे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शेने करण्यात आली. राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक ठिकाणी तोडफोडी च्या घटना घडल्या. तसेच पोलिस, भाजप तसेच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
त्या वक्तव्याचं समर्थन नाही पण…
राणे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना आणि त्यांना अटक करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्राचे मुख्मयंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटावर केआरकेची टीका, म्हणाला…
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा


