Share

इंधनापाठोपाठ आता गोडतेलही लिटरमागे ७ रुपयांनी स्वस्त!

Published On: 

मुंबई : दिवाळ्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना आणखी एक सुखद बातमी मिळाली आहे, आता पेट्रोल डिझेल पाठोपाठ गोडतेलही ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत इंधनदरात दिवसेंदिवस वाढ सुरुच होती. दिवाळीपूर्वी दिड महिन्यांत पेट्रोल डिझेलच्या दरात पंधरा वेळा वाढ करण्यात आली होती. जगातील खाद्यतेल बाजारात पुरवठा वाढला आहे. खाद्येतलाची टंचाई येणाऱ्या काळात जाणवली जाणार नाही. गोडतेलाच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ऑल इंडिया एडिबल ऑइल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आयात शुल्कामध्ये कपात केली आहे. त्यामुळे प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी त्यांच्या घाऊक दरामध्ये किमान ४ ते ७ रुपयांची कपात केली आहे. ही आयात शुल्क कमी झाल्यानंतर लगेच ही कपात व्हायला हवी होती. मात्र, उशिरा का होईना दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरातही घसरण

सरकारच्या या निर्णयामुळे देशाची राजधानी दिल्लीत नवे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ६.०७ रुपये आणि ११.७५ रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ आणि ९४.१४ रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!