Share

सकाळी मुलाचे लग्न उरकून दुपारी दादा भुसे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

मुलाच्या लग्नाच्या दिवशीही कृषीमंत्री दादा भुसे यांना कर्तव्याचा विसर पडलेला नाही. मालेगावमधील सहारा कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन भुसेंनी रुग्णांसाह नातेवाईकांची विचापूस केली. सुपुत्र आविष्कार भुसे यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्यानंतर दादा भुसे लगेच ऑन फील्ड गेले. कृषीमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोमवार 26 एप्रिल रोजी झाला. मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोजक्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता.

सकाळी मुलाचे लग्न उरकून कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या नियोजित कामला सुरुवात केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोव्हिड सेंटरमध्ये जावून त्यांनी अनेक कोरोना बाधित रुग्णांची चौकशी केली. त्यांच्या अडचणींचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. त्यांच्या या कार्यक्षमतेचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!