Share

Political Crisis : चव्हाण, पवार, गडकरीनंतर फडणवीसांबाबतही दिल्लीचा कुटील डाव : राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळ्यात मोठा बॉम्ब फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी याआधी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादी कडून यावर मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटलं कि, नेहमीच एखाद महाराष्ट्रातील नेतृत्व मोठं होऊ लागलं कि केंद्रातील दिल्लीच्या राजकारणात त्याचे खच्चीकरण करण्याच्या खेळीस सुरवात होते. मग कॉंग्रेस असो भाजप या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील नेत्यांची कायम मुस्कटदाबी केली आहे. यापूर्वी दिगवंत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत महाराष्ट्राने दिल्लीतील राजकारण्यांच्या खेळीचा अनुभव घेतला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा आहे, असे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!