मुंबई : शिवसेनेसोबत बंडाळी करणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. एकनाथ शिंदे यांनी याआधी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. यानंतर या घडामोडींवर आता शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले कि, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. योग्य वेळी त्यांच्याशी बोलू. सर्व गैरसमज दूर होतील. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आम्हाला सर्वांना एक सुखद धक्का बसल्याचेही सांगितले. शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार देखील मानले.
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा आहे, असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

