मुंबई : ऋषभ पंतचे शतक आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) पाचव्या कसोटीत चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या आहेत. पंत १४६ धावा करून बाद झाला. जडेजा ८३ धावांवर खेळत आहे. दोघांनी सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ३ आणि मॅथ्यू पॉट्सने २ बळी घेतले.
भारताचा पहिला डाव
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल यांनी भारतासाठी सलामी दिली. पहिल्या गड्यासाठी २७ धावा केल्यानंतर शुबमन गिल (१७) माघारी परतला. त्यानंतर अर्धशतकापूर्वी चेतेश्वर पुजाराही (१३) बाद झाला. दोघांना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने जॅक क्रॉलीकरवी झेलबाद केले. उपाहारानंतर विराट कोहली (११), हनुमा विहारी (२०) यांना मॅथ्यू पॉट्सने बाद करत भारताला संकटात टाकले. ९८ धावांवर भारताने ५ गडी गमावले. त्यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सावरले आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कठीण परिस्थितीत फलंदाजीसाठी आलेल्या पंतने ८९ चेंडूत पाचवे कसोटी शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धचे पंतचे हे तिसरे शतक ठरले. जो रूटने पंतला झेलबाद केले. पंतने २० चौकार आणि ४ षटकारांसह १४६ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर जडेजाने मोर्चा सांभाळला.
It's Stumps on the opening Day of the #ENGvIND Test at Edgbaston! @RishabhPant17 put on an absolute show to score a cracking 146. ???? ???? @imjadeja remains unbeaten on 83. ???? ????#TeamIndia post 338/7 on the board at the close of play.
Scorecard ▶️ https://t.co/xOyMtKrYxM pic.twitter.com/4wSDG6EMa3
— BCCI (@BCCI) July 1, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार).
इंग्लंड – अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

