मुंबई : काल अखेर राज्याला आपला नवा मुख्यमंत्री मिळाला. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनीं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात न राहण्याचा निर्णय घेतला होता. ते बाहेरून सरकारवर लक्ष ठेवणार होते.
मात्र त्यांना दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र यानंतर पक्षश्रेठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत का ? असा चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा आहे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

