मुंबई : अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. मध्यंतरी रशिद खान याच्यावर ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्या नंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे सध्या केआरके कोणत्या न कोणत्या कारणामुळे सध्या सतत चर्चेत येत आहे. नुकतेच त्याने कंगनाला ‘दीदी’ म्हणाल्यामुळे सोशल मीडीयावर केआरकेला ट्रोल करण्यात येत आहे.
![]()
केआरकेने त्याच्या ट्विटर अकाउंटवर घोषणा करत लिहिलं, ‘दीदी कंगना रनौतने तिचा पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावर माझी समिक्षा उद्या रिलीज करणार आहे.’ याच दरम्यान कंगना रनौतच्या या याचिकेवर सुनावणी २५ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली. पण या ट्विटमध्ये केआरकेने कंगना रनौतला ‘दीदी’ म्हटलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी केआरकेला ट्रोल करणं सुरू केलं. त्याला ट्रोल करत असतानाच तो कंगनापेक्षा वयाने मोठा असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे.
![]()
यावर केआरकेनं ट्विट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. यात त्याने लिहिलं, ‘काही मुर्खांना कंगना रनौतला दीदी म्हटल्याने प्रॉब्लेम झाला आहे. दीदी याचा अर्थ बहिण असा होतो. याचा वयाशी कोणताच संबंध येत नाही, आता तरी कळलं का मुर्खांनो?’, असे म्हणत त्याने ट्रोलर्सना सुनावले आहे.
कंगनाने तिच्या पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केलीय. यात ‘कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे’. यासाठी कंगनाला प्रवास करणं गरजेचे असल्याचं या याचिकेत सांगण्यात आले होते. मात्र तिला याबाबत दिलासा मिळाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

