बिहार : बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. एकूण २४३ मतदारसंघ असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
‘शिवसेनेतर्फे बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० ते ५० जागा लढण्याबाबतचा आमचा विचार आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना बिहारचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा हे देखील उपस्थित होते. बिहार निवडणुकांमध्ये ५० जागा पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर,योग्य वेळी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते.
दरम्यान, बिहार निवडणुकांमध्ये जेडीयू या पक्षाचं देखील बाण हे चिन्ह असल्यानं मतदारांमध्ये घोळ होतो अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शिवसेनेला पर्यायी चिन्ह वापरावं अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शिवसेनेने ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट अशा तीन चिन्हांपैकी एक मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘बिस्कीट’ चिन्ह दिलं होतं. यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाला चिन्ह बलून मिळावं यासाठी पत्र लिहिलं होत.
आता, शिवसेनेच्या मनाप्रमाणे चिन्ह मिळालं असून शिवसेना देखील यावर खुश आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या मागणीची दाखल घेत ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली माहिती
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील


