मुंबई : पुण्यातील कात्रज परिसरात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचं म्हटलं जात आहे. कारण याच परिसरात काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा देखील होती. त्याचवेळी त्या भागातून जाणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीच्या ताफ्यावर उपस्थितांनी हल्ला केला. त्यामुळे हल्ला करणारे हे शिवसैनिकच होते, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या हल्ल्याचा शिंदे समर्थकांनी निषेध केला आहे. तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी या हल्ल्याचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार असल्याचे समोर येत आहे.
सामंतांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान उदय सामंत यांच्यासह शिंदे गटातील आमदारांना सध्या ‘वाय प्लस’ (Y plus) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पण या निर्णयानंतर त्यात आणखी वाढ होणार आहे.
दरम्यान सामंतांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही काही संतप्त प्रतिक्रिया येण्याची दाट शक्यता आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हल्लेखोरांची चौकशी आणि तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर पोलिसांनी तपास करून सूरज लोखंडे, संभाजी थोरवे, बबन थोरात आणि संजय मोरे यांच्यासह इतर काही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Patra Chawl Scam | संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 प्लॉट खरेदी केले, ED च्या आरोपाने खळबळ
- Ajit pawar | अजित पवार यांच्यासह शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन
- Uday Samant | “आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर…” ; उदय सामंत यांचा इशारा
- Nina Gupta | “अभिनेत्यांना फक्त तरुण अभिनेत्रींसोबत काम करायचंय”; नीना गुप्तांचं बोल्ड विधान चर्चेत
- Taiwan | जाणून घ्या… तैवानचा इतिहास आणि तेथील वैशिष्ट्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

