🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. चंद्रपूर, गडचिरोली यासह अनके भागात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी सरकारकडे केली. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तशी लिखित विनंतीही केली होती. मात्र तरीही सरकारने काही भूमिका घेतली नाही. त्यामुळे काल त्यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले होते. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तात्काळ आणि निकषांच्या मर्यादेपलीकडे जाऊन मदत करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे कदाचित आता सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याची शक्यता आहे. दरम्यान जेव्हापासून राज्यात अतिवृष्टी सुरु झाली तेव्हापासून अजित पवार यांनी स्वतः दौरे करून सर्व भागांची पाहणी करत आढावा घेतला आहे. त्यानंतर ते सातत्याने ओला दुष्काळ जहर करण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारने असा कोणताही निर्णय अजून जाहीर केलेला नाही. तसेच या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी देखील चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra व मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली. #NCP pic.twitter.com/meSP5S27bB
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 3, 2022
तर या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार दत्तामामा भरणे, आमदार अनिल पाटील, आमदार सुनील भुसारा हे सहभागी झाले होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Uday Samant | “आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर…” ; उदय सामंत यांचा इशारा
- Nina Gupta | “अभिनेत्यांना फक्त तरुण अभिनेत्रींसोबत काम करायचंय”; नीना गुप्तांचं बोल्ड विधान चर्चेत
- Taiwan | जाणून घ्या… तैवानचा इतिहास आणि तेथील वैशिष्ट्ये
- Gopichand Padalkar | “म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची – गोपीचंद पडळकर
- Asia Cup 2022 : आशिया चषकात विराट कोहली देऊ शकतो भारतासाठी सलामी; ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
