Share

Patra Chawl Scam | संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 प्लॉट खरेदी केले, ED च्या आरोपाने खळबळ

Published On: 

🕒 1 min read

Patra Chawl Scam | मुंबई : महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) ताब्यात आहेत. संजय राऊत यांनी 10 प्लॉट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याची माहिती ईडी तपासात समोर आली आहे. पत्रा चाळ घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाचा वापर अलिबागमधील किहीम बीचवर असलेल्या या 10 प्लॉट खरेदीसाठी करण्यात आला होता आणि ही रक्कम प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना दिली होती, असे ईडीने सोमवारी सांगितले. प्रवीण राऊत हा गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचा संचालक असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

पत्रा चाळ मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईतील दोन ठिकाणी झडती घेतली, ज्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन परिसरांपैकी एकामध्ये एचडीआयएल (हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) या फर्मसाठी रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानाचा समावेश आहे आणि दुसरा परिसर कंपनीचा आहे.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमन’-

पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळालेले पैसे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आले आणि प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना रोख रक्कमही दिली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या रिमांड अहवालात म्हटले आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून दरमहा लाखो रुपये मिळत असत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे 1.06 कोटी रुपये वळवले. यासोबतच प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमन’ असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!