महाराष्ट्र देशा डेस्क : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्या त्यांच्या बोल्डनेस आणि परखड मतांसाठी ओळखल्या जातात. असंच काहीसं विधान त्यांनी नुकतंच केलं आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ६३ वर्षीय नीना गुप्ता यांच्याकडे आजही अनेक चित्रपट आणि प्रोजेक्ट्स सातत्याने येत आहेत. मात्र, नीना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, पुरुष कलाकारांना त्यांच्यासोबत काम करायचे नाही. लैंगिकता आणि वयवादाबद्दल बोलताना त्या असेही म्हणाल्या की, अनेक पुरुष अभिनेत्यांना केवळ त्यांच्यापेक्षा तरुण अभिनेत्रींसोबत काम करायचे आहे.
नीना गुप्ता एका मुलाखतीत म्हणाल्या, “असे २-३ प्रोजेक्ट्स आहेत ज्यात मी माझ्या दिग्दर्शकाला विचारले कि माझा सह अभिनेता कोण आहे?”, पण तो म्हणाला, “तुम्हीच एखादा अभिनेता सुचवा.” यावर मी म्हणाले कि, “हे सर्वात कठीण काम आहे, कारण माझ्याबरोबर कोणाला कामच करायचे नाही. पुढे त्या असंही म्हणाल्या, “माझ्यासोबत काम करायला कोणी तयार नाही. अनेक अभिनेत्यांना तरुण अभिनेत्रींसोबत काम करायचे आहे. खरं तर मी त्यांच्यापेक्षा अजूनही वयाने लहानच दिसते. मात्र आपला समाज अजूनही बदलेला नाही. तुम्ही आणि मी अल्पसंख्याक आहोत. आपण पुरुषप्रधान समाजात राहतो आणि ते नेहमीच असेच राहणार आहे.”
नीना गुप्ता या काही वर्षांपासून इंडस्ट्रीतुन गायब झाल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्ये नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी लिहिले होते कि, “मी एक चांगली अभिनेत्री आहे, मुंबईत राहते आणि चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम शोधत आहे.” त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. काही चित्रपटात त्यांनी कामंही केली. मात्र तेव्हापासून त्या नेहमीच त्यांच्या बोल्ड विधानांमुळे, बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असतात.
नीना यांनी ‘साथ साथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपट आणि टीव्हीमधील प्रदीर्घ कारकीर्दीनंतर, त्यांनी 2018 मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटाद्वारे दमदार कमबॅक केले. त्या आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये मुलगी मसाबा गुप्तासोबत दिसल्या आहेत. या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये नीना-मसाबासोबत राम कपूरही मुख्य भूमिकेत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Asia Cup 2022 : आशिया चषकात विराट कोहली देऊ शकतो भारतासाठी सलामी; ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यावर्षी दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडणार, ‘अशा’ आहेत सामन्यांच्या तारखा!
- Cm Eknath Shinde Meets Prakash Amte | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली डॉ प्रकाश आमटे यांची भेट
- Uddhav thackeray | “… पण आता तर शिवसेना संपविण्याचाच प्रयत्न”; उद्धव ठाकरेंची नड्डा यांच्यावर टीका
- China-Taiwan Conflict | तैवान दुसरे युक्रेन बनणार? चीनने चारही बाजूने घेरले


