सिल्लोड : अनाड या गावांतील अनधिकृत अतिक्रम मंदिरे व देवालये यांच्या आजूबाजूला केलेले अवैध अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायत सदस्य मनिषा संदीप मानकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर १५ जून पासून आमरण उपोषण सुरु केले. मात्र ग्रामपंचायतीने सर्व अतिक्रमणे काढण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयाने विचार विनिमय करुन सर्व अतिक्रमण मोजमाप करण्यासाठी, नोटिसा बजावण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला २ महिने देऊन सहकार्य करावे दोन महिन्यातच आपल्या सर्व मागण्या मार्गी लागतील असे लेखी पत्र दिले. त्यावर सायंकाळी साडेआठ वाजता हे उपोषण अजिंठा पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल मा.कविता चाथे, व सरपंच सौ.रामकोरबाई बिरारे यांचे हातून लिंबू पाणी पाजून सोडण्यात आले.
या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर. जी. पठाण, ग्रामविकास अधिकारी डी. जे.बोराडे, उपसरपंच प्रविण जाधव, ग्रामपंचायत सदस्य गजानन गदाई, ग्रा.पं.भागवत शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ पवार, पोलीस कॉन्स्टेबल के.जी.चव्हाण, माजी सरपंच तेजराव पवार, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गोंडे, विनायक पाचिंगे, महाराष्ट्र जोशी समाज समितीचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, योगेश भिसे, गणेश पाचिंगे, श्रावण भिसे, श्रीकांत मानकर, संजय यदमळ आदींसहित सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज कंपनी करणार मराठवाड्यात गुंतवणूक!
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

