Share

खराब कामगिरीनंतर कृणाल पांड्याने सोडले बडोदा संघाचे कर्णधारपद

Published On: 

नवी दिल्ली : बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मधील खराब कामगिरीनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी हंगामात तो यापुढे संघाचा कर्णधार नसणार आहे. पंड्याने बडोदा क्रिकेट (Baroda Team) असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव अमीन यांना ईमेलद्वारे ही माहिती दिली आहे.

एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार पंड्याने ईमेलमध्ये लिहिले, ‘तुम्हाला कळवत आहे की, आगामी स्थानिक हंगामात मी बडोदा संघाचे नेतृत्व करू शकणार नाही. मात्र, आपण संघात निवडीसाठी उपलब्ध राहणार असल्याचेही त्याने ईमेलमध्ये स्पष्ट केले आहे. त्याने लिहिले, ‘मी संघातील खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम देईन.’

कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा संघाची कामगिरी निराशाजनक होती. हा संघ ब गटात होता आणि स्पर्धेच्या शेवटी तो तळाच्या स्थानावर होता. बडोदा संघाने ग्रुप स्टेज मध्ये खेळलेल्‍या केवळ पाच सामनेसामन्यांपैकी एक सामन्यात विजय मिळवला आणि चार सामने गमावल्‍याने, हा संघ पुढे जाऊ शकला नाही.

संघाची कामगिरीच नव्हे तर पंड्याची स्वत:ची कामगिरीही निराशाजनक होती. कृणाल पांड्याने पाच सामन्यांमध्ये एकूण 87 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने गोलंदाजीत ५.९४ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आणि ५ बळी घेतले. बडोदा संघाचे प्रशिक्षक म्हणून डेव्ह व्हॉटमोरच्या पहिल्या सत्राची सुरुवात संघाच्या खराब कामगिरीने झाली.

एका वृत्तानुसार, बडोदा क्रिकेट असोसिएशन विजय हजारे ट्रॉफीच्या आगामी हंगामासाठी बडोदा संघाचा नवा कर्णधार म्हणून केदार देवधर यांची नियुक्ती करू शकते. दुसरीकडे, फिरकी गोलंदाज भार्गव भट्टची उपकर्णधारपदी निवड होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!