इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीच्या मुलीचं लवकरच लग्न होणार आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीसोबत शाहिद आफ्रिदीची मुलगी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. शाहिन आफ्रिदी लवकरच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे.
शाहिद अफरीदीची मुलगी आणि पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी रिलेशनमध्ये काही दिवसांपासून असल्याच्या चर्चांना देखील सोशल मीडियावर उधाण आलं होतं. त्या चर्चांनाही फेटाळून लावत शाहिद आफ्रिदीनं आता मोठा खुलासा केला आहे. शाहीन आणि अक्शा आधीपासून रिलेशनशिपमध्ये नव्हते असाही खुलासा शाहिद अफरीदीने केला आहे.
शाहिन आता क्रिकेट खेळतोय. तर अक्सा शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे हे दोघे 20 वर्षांचे आहेत. त्यामुळे साखरपुड्या बाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र कुटुंबियांच्या माहितीनुसार लवकरच साखरपुडा उरकण्यात येणार आहे. तर पुढील 2 वर्षानंतर लग्नगाठ बांधण्यात येणार आहे.
लवकरच शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आणि फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी यांचा साखरपुडा होईल. साखरपुड्याच्या दोन वर्षात हे दोघं लग्न करतील. अक्साचं शिक्षण संपल्यानंतर लगेचच हा सोहळा पार पडेल.
महत्वाच्या बातम्या
- मुहुर्त सापडला! आयपीएल २०२१ स्पर्धेची तारिख ठरली
- हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीचे अनोखं फोटोशुट पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया
- ‘खूप कमी माणसं असतात ज्यांच्या बरोबर तुम्ही मनमोकळ हसू शकता’; स्वप्नीलने शेअर केला सुंदर व्हिडीओ
- खुनाच्या आरोपाखाली फरार कुस्तीपटू सुशील कुमारला अखेर दिल्ली पोलीसांनी ठोकल्या बेड्या
- ‘इंडियन आयडॉल १२’ चा आणखी एक ड्रामा समोर; सायली कांबळेच्या पालकांना सांगितले असे करायला


