Share

आदित्य ठाकरेंनी पाळला शब्द; ‘निर्णय’ घेताच ग्रामस्थांनी वाजवल्या टाळ्या

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: नांदगाव, वारेगाव येथील प्रदूषणाचा मुद्द्यावरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी येथे भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाजनकोने टाकलेल्या मंडपात न जाता थेट गावकऱ्यांनी पंप हाऊसजवळ टाकलेल्या मंडपाला भेट दिली.

नांदगाव या गावातील दोन विहिरी असलेल्या पेंच नदीत थेट राखेच्या बंधाऱ्यातील राख सोडली जाते. ते ठिकाण पर्यावरणमंत्र्यांना येथील गावकऱ्यांनी दाखवले. या राखेच्या बंधाऱ्यामुळे संपूर्ण गावात तसेच त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्याची माहिती ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यानं दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे येथील ग्रामस्थांशी बोलताना थेट जमिनीवर बसले होते. यावेळी राखेबद्दल प्रश्न गावकऱ्यांकडून विचारण्यात आला. राख टाकणे बंद करण्याचे आदेश तात्पूरते आहेत की कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश आहेत, असा प्रश्न महिलांच्यावतीने प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात समोर असणाऱ्या अश्विनी ठाकरे यांनी विचारला. यावर हे आदेश कायमस्वरुपी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!