Share

लोकशाही प्रक्रियेत प्रजाच राजा; हा सोहळा मतदान करून साजरा करावा-अभिनेत्री चिन्मयी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: लोकशाही प्रक्रियेत प्रजाच राजा आहे. मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा. मताचे मोल ओळखावे. मतदानाचा दिवस लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा व्हावा. यासाठी सर्व तरूण मंडळींनी संवेदनशीलपणे लोकशाहीचा हा सोहळा मतदान करून साजरा करावा. भारतीय संविधानाने सर्वांना मताचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे. हा हक्क तर प्रत्येकाने बजावावाच, परंतु इतरांनाही प्रेरीत करावे, असे आवाहन अभिनेत्री चिन्मयी सुमीत(Chinmayi) यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चिन्मयी सुमित यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेता मकरंद अनासपुरेंची देखील उपस्थिती होती. यावेळी अनासपुरे म्हणाले, दुर्गम भागात मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जबाबदार नागरिकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होणे उचित असल्याचे मत मांडले.

ग्रामीण भागात मताचे मोल कळावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. हिवरेबाजार सारख्या ग्रामपंचायतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांनी वाटचाल करायला हवी. निर्भिड, निस्पृह, पारदर्शकपणे मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास मत द्यावे, असेही अनासपुरे म्हणाले. कार्यक्रमास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, प्र.कुलगुरू प्रा. डॉ.श्याम शिरसाट, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थ‍िती होती. डॉ. येवले यांनी देशाची प्रत्येक अडचण सोडविण्याची ताकद भारतीय संविधानात असल्याचे प्रतिपादन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!