Share

नेत्यांची नव्हे, तर सरकारी कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लागणार; केजरीवाल यांची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे आता दिल्लीतील सरकारी कार्यालयात लावण्यात येणार आहेत. कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात येणार नाहीत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या ७० वर्षापासून आपले सरकार बाबासाहेब आणि भगतसिंग यांची स्वप्ने पूर्ण करत आहे. या देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांत शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी काम केले आहे. बाबासाहेब आणि भगतसिंग यांनी अशा भारताचे स्वप्न पाहिले होते जिथे सर्वांना समान अधिकार असतील. दिल्ली सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे.”

आपल्या भाषणात अरविंद केजरीवाल म्हणाले की, "स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. गेल्या सात वर्षांपासून दिल्ली सरकारने शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी काम केले. सरकार स्थापन होताच शिक्षणाचे बजेट २५ टक्के करण्यात आले. आता आम्ही आमच्या शाळांमध्ये मुलांना चांगला माणूस आणि कट्टर देशभक्त बनवून व्यवसाय करायला शिकवत आहोत. यातून बाबासाहेब आणि शहीद भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.”

तसेच दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये यापुढे कोणत्याही नेत्याचे छायाचित्र असणार नाहीत, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची छायाचित्रे लावली जाणार नाहीत. त्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत. आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी खूप आशीर्वाद दिला असता, असे केजरीवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!