Share

VIDEO : …अन् बापानंच लगावली कानशिलात..! पाहा शिखर धवनसोबत नक्की घडलं काय?

Published On: 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केल्यानंतर शिखर धवन सध्या घरी मजा करताना दिसत आहे. तो त्याच्या सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतो. इनस्टाग्रामवर तो अनेक व्हिडिओ शेयर करतो.  त्याचा त्यातलाच एक वडीलांबरोबरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात त्याच्या वडीलांनी शिखरला झापड मारलेली दिसत आहे

शिखर धवनने इनस्टाग्रामवार ही रील पोस्ट केली आहे ज्यात तो दरवाजा बाहेर उभा राहून फिल्मी डायलॉग मारत आहे ज्यानंतर त्याचे वडील येऊन त्याला झापड मारत घरात यायला सांगतात. शिखरने या व्हिडिओ खाली ” बाप बाप ही होता है” असे मजेशीर कॅप्शन लिहले आहे. शिखरचा हा फिल्मी व्हिडिओ चाहत्यांना फार भावला आहे. त्याच्या या रीलखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच त्याच्या पोस्टला लाखों लाईकस मिळत आहे.

शिखर धवनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत १६९ धावा केल्या होत्या. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आगामी वेस्ट इंडिज सोबतच्या मालिकेत तो खेळताना दिसणार आहे. सोबतच फेब्रुवारीमध्ये मेगा ऑकशन होणार आहे, त्यामुळे अनेक संघांमध्ये गब्बरला विकत घेण्यासाठी चुरस दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!