औरंगाबाद: औरंगाबादच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. कोविड काळात जगभरातील आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली होती. तशीच औरंगाबादलाही या संकटाला तोंड देताना कठीण काळातून जावे लागले. परंतु सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने पुढे जात आहे. १५२ कोटी रूपयांचे रस्ते शहरात झाले आहेत. असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी संत एकनाथ मंदिर लोकार्पण कार्यक्रमात केले.
संत एकनाथ रंग मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला शासनाने प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. तसेच संत एकनाथ रंग मंदिराच्या नूतनीकरण आणि लोकार्पणामुळे औरंगाबादच्या सांस्कृतिक विकासामध्ये अधिक भर पडण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, औरंगाबाद शहरात घनकचऱ्याचे संपूर्ण व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने होते आहे. क्रांती चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लवकरच विराजमान होत आहे. खाम नदीचे पुनरूज्जीवन झाले आहे. गुंठेवारीचा ऐतिहासिक असा निर्णय शासनाने घेतल्याने शहरातील दोन लाख घरांना शासनाच्या निर्णयाचा लाभ होत आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासात अधिक भर घालण्यासाठी मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे अत्याधुनिक सोयीसुविधांनी औरंगाबाद जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे यावेळी देसाई म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘ख्रिस गेलने’ने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाला…
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर फौजी पित्याने कोर्टाबाहेर घातल्या गोळ्या; वाचा संपूर्ण घटनाक्रम
एकाच दिवसात गोल्डनबॉय नीरज चोप्राला दोन पुरस्कार; भावनिक होत म्हणाला…
“मोठ्या माणसांशी मोठ्या माणसांनीच बोलावं, मी फार छोटा माणूस…”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी; केले शासकिय ध्वजारोहण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

