Share

Aditya Thackeray । तीन पक्ष बदलणाऱ्या केसरकरांवर कसा विश्वास ठेवणार; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

Published On: 

Aditya Thackeray । मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर हे अनेक गौप्यस्फोट करत आहे. केसरकर यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे या वादात अजून एक ठिणगी उडण्याची शक्यता आहे. केंद्रय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं गंभीर वक्तव्य केसरकर यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपसोबत जाणार होते, असा दावा करण्यात आला. केसरकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, तीन पक्ष बदलून झाल्यानंतर चौथ्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. गौप्यस्फोट करताायत, करू द्या. शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत यांचे कारणं बदलेली आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की, कोणालाही यांनी केलेली गद्दारी पटली नसल्याची टीका आदित्य यांनी केली.

नेमकं काय म्हणाले होते केसरकर ?

दीपक केसरकर म्हणाले कि, उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती. 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असंही ते म्हणाले.

तसेच आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे, असंही केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!