🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होण्याची वाट सर्वच जण बघत आहेत. हीच प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण या महिन्यातच देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नुकताच यासाठीच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला आहे. त्यानुसार एअरटेल या महिन्यात 5G सेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर जिओ देखील 15 ऑगस्टपासून आपली 5G सेवा सुरू करू शकते. पण 5G इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन्स असणे आवश्यक असेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच पाच 5G स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे फिचर आणि पॉकेट फ्रेंडली किंमत बघून तुम्हीही थक्क व्हाल.
1. Samsung Galaxy M13 5G
या फोनमध्ये MTK D 700 octa core प्रोसेसर आहे. मागील बाजूस 50MP + 2MP चे ड्युअल कॅमेरे उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे. याचा डिस्प्ले ६.५ इंचाचा आहे. तसेच 5000mAh बॅटरी आहे. याची किंमत फक्त 13,999 रुपये इतकी आहे.
2. Moto G51 5G
या फोनमध्ये 6.8 इंचाचा फुल HD + डिस्प्ले आहे. ट्रिपल रिअल कॅमेऱ्यांचा सेटअप 50MP + 8MP + 2MP असा असेल आणि 13MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध असेल. ज्याची बॅटरी 5000mAh आहे. जी एकदा चार्ज केल्यावर दिवसभर चालते. यात 480+ SoC प्रोसेसर असून या फोनची किंमत फक्त 12,249 रुपये आहे.
3. Realme Narjo 30 5G
या फोनला 90HZ डिस्प्ले असून 6.5 इंच आकाराची स्क्रीन आहे. यामध्ये 5000mah बॅटरी सपोर्ट आहे. यात मीडियाटेक डाइमेंसिटी 700 5G प्रोसेसर असून 48MP चा कॅमेरा आहे. हा फोन 2 स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 4GB + 64GB साठी 14,999 रुपये आणि 6GB + 128GB साठी 16,999 रुपये इतकी आहे.
4. Poco M4 Pro 5G
Poco M4 Pro 5G हा फोन 3 स्टोरेज प्रकारांमध्ये येतो. यामध्ये 4GB + 64GB ची किंमत 12,499 रुपये, 6GB + 128GB ची किंमत 14,499 रुपये आणि 8GB + 128GB ची किंमत 16,499 रुपये आहे. यात 6.6 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. तसेच 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 5000mah बॅटरी असून प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंशनचा 810 आहे.
5. Redmi Note 10T 5G
हा फोन देखील दोन स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे. 4GB + 64GB वेरिएंटसाठी याची किंमत 11,999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 13,999 रुपये आहे. यात 48-mp ट्रिपल रिअर कॅमेरे, मीडियाटेक डाइमेंसिटी 700 SoC प्रोसेसर आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते.
जर तुम्हालाही सुपरफास्ट 5G इंटरनेट वापरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी 5G स्मार्टफोन असायलाच पाहिजे. त्यामुळे तुम्हीही 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हे फोन नक्की ट्राय करा.
महत्वाच्या बातम्या:
- Rahul Narvekar । “पिठासीन अधिकारी म्हणून… “; शिंदे – ठाकरे यांच्यातील संघर्षावर नार्वेकरांच मोठं विधान
- Ravindra Jadeja | CSK वर रवींद्र जडेजाची नाराजी वाढली? इन्स्टा पोस्टनंतर ट्विट हटवले
- Congress। भाई जगतापांना पोलिसांनी ताब्यात घेताना अक्षरश: फरफटत नेले
- Sanjay raut | “बाळासाहेब म्हणायचे, रडायचं नाही, लढायचं…”; संजय राऊतांनी पाठवलं पत्र
- Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे पुन्हा सामनाचे मुख्य संपादक! राऊतांच्या अटकेनंतर महत्त्वाचा बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
