Balasaheb Thorat । मुंबई : देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून भाजपचा निषेध नोंदवला आहे. दिल्लीत आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत.
यानंतर यावर आता बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपण लोकशाहीत आहोत पण राज्य सरकार जनतेच्या प्रश्नावरील आंदोलन करण्यापासूनही रोखत आहे. केंद्र सरकारने मुलांच्या दुधावर जीएसटी लावला, मीठवर, पीठावरही जीएसटी लावला. महागाईने जनता त्रस्त असताना सरकारला जाब विचारायचा नाही का ? हे कसले सरकार.. ED सरकारच्या राज्यात आंदोलन करण्यावरही बंदी आहे का? ब्रिटिशांच्या काळातही लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला बंदी नव्हती, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या पोलीसी दंडेलशाहीचा निषेध करत आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही. पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी सरकारने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू, असं पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole । दडपशाहीने आंदोलन चिघळण्याचा भाजप प्रयत्न करतंय; नाना पटोलेंचा आरोप
- Pravin Draekar | भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
- 5G Internet and Smartphones | 5G इंटरनेट होतंय लॉंच; पहा कोणते आहेत पॉकेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन्स
- Rahul Narvekar । “पिठासीन अधिकारी म्हणून… “; शिंदे – ठाकरे यांच्यातील संघर्षावर नार्वेकरांच मोठं विधान
- Ravindra Jadeja | CSK वर रवींद्र जडेजाची नाराजी वाढली? इन्स्टा पोस्टनंतर ट्विट हटवले


