Share

‘इंडियन आयडल १२’ या रिअॅलिटी शोबद्दल आदित्य नारायणने केला मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय होत असताना अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली आहे. हल्ली टीआरपीसाठी रिअ‍ॅलिटी शो काय करतील याचा नेम नाही. याबाबत ‘इंडियन आयडल १२’ शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याने मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत आदित्यने सांगितले की, ‘इंडियन आयडल १२ ‘ मध्ये पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सांगण्यात येतेय, पण हे सगळं खोटं आहे. पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल बनावटी असून त्यात काहीही सत्य नाही. दोघेही मुळीच रिलेशनशिपमध्ये नाहीत, असे आदित्यने कबुल केल आहे.

पवनदीप व अरूणिताचा खोटा लव्ह अँगल का दाखवला जातोय, असे विचारले असता यामागे निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा एकच उद्देश असल्याचे तो म्हणाला. एक एपिसोड ९० मिनिटांचा असतो. यात स्पर्धकांच्या परफॉर्मन्सशिवाय आणखी काय दाखवले जाईल, हे ठरवले जाते. प्रेक्षकांनी कंटाळून चॅनल बदलू नये आणि त्यांचे मनोरंजन व्हावे, या एकाच हेतूने काही गोष्टी दाखवल्या जातात. पवनदीप आणि अरुणिता यांनी एकमेकांबद्दल छेडणे हा मस्तीचा भाग असतो. ते कोणीही सीरिअस घेत नाही तर फक्त एन्जॉय करतात, असे आदित्य म्हणाला.

तसेच पुढे त्याने मी प्रेक्षकांना विनंती केली की, त्यांनी फक्त शोच्या स्पर्धकांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं. आम्ही सर्वजण आपआपल्या भूमिका साकारत आहोत. स्टेजवरच्या आणि प्रेक्षकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा फक्त रिअ‍ॅलिटीवर फोकस करा आणि उर्वरित गोष्टी फक्त एन्जॉय करा. मालिकेतील कलाकार एक सीन शूट केल्यानंतर लगेच त्यांच्या ख-या पार्टनरकडे जातात, असेही आदित्य यावेळी म्हणाला. या शोमधील एकामागे एक खुलासे होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. मात्र पवनदीप व अरूणिता यांच्या चाहता वर्गाला हे समजल्यानंतर चांगलाच धक्का बसला असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!