🕒 1 min read
मुंबई : येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हीलीयर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी चर्चा सुरु होती. मात्र दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने एबी डिव्हीलीयर्सचा निवृत्तीचा निर्णय हाच अंतिम निर्णय होता असे स्पष्ट करत एबीच्या पुनरागमनाच्या सर्व चर्चांना पुर्णविराम लावला आहे.
मिस्टर ३६० अशी जागतीक क्रिकेटमध्ये ख्याती असलेला एबी डिव्हीलीयर्सने तीन वर्षापुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. यानंतर तो सातत्याने जगभरातल्या विविध टी-२० स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो तुफान फलंदाजी करत आहे. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत एबी डिव्हीलीयर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी चर्चा सुरु होती. याबद्दल दक्षिण अफ्रिका संघाचे माजी खेळाडू मार्क बाउचर आणि ग्रॅमी स्मिथ यांनी त्याच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते.
यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने एबी डिविलियर्सबरोबरील पुनरागमनाविषयी चर्चा केली. या चर्चांनंतर एबीने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले. त्यामुळे डिविलियर्स पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये दिसणार नाही, हे नक्की झाले आहे. २०१८ साली मे महिन्यात डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’
- मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावला, प्रेमी मजनू म्हणाला विवाहांवर पण बंदी आणली तर…

