Share

१९ मे रोजी प्रदर्शित होणार ‘फॅमिली मॅन २’चा ट्रेलर; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची घोषणा

Published On: 

मुंबई : मनोज वाजपेयी म्हणजे एक सशक्त अभिनेता. मनोज वाजपेयीने त्याच्या कारकिर्दीत अनेक एकापेक्षा एक सरस चित्रपटात सक्षम अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसापुर्वी मनोज वाजपेयीची एक फॅमिली मॅन या नावाची वेब सिरीज आली होती. ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्कंठा लागली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये या मालिकेचा दुसऱा भाग येणार होता. मात्र काही कारणास्तव हे प्रदर्शन पुढे ढकलले. यामागे कारण होते अमेझॉन प्राइमची ‘तांडव’ ही सिरीज. तांडवच्या बाबतीत एक नकारात्मक विचारांची साखळी तयार झाली होती. त्यामुळे त्याकाळात फॅमिली मॅनवर प्रभाव पडला असता.म्हणून या शोचे प्रदर्शन लांबवले गेले.

मात्र आता प्रतिक्षा संपली आहे. फॅमिली मॅन २ चा ट्रेलर हा १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अशी घोषणा अमेझॉन प्राइमने केली. ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून त्यांनी ही माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी ‘द फॅमिली मॅन २’ चे दोन नवे पोस्टर देखील शेअर केले आहेत. परंतू हा ट्रेलर नक्की किती वाजता रिलीज होईल, याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोस्टरमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासोबत पहिल्यांदाच अभिनेत्री सामंथा अक्कीनेनीला दाखवण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!