🕒 1 min read
पाटोदा:- राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना धक्का बसला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीत पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव झाला आहे. अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव झाल्याने हा भास्कर पेरे पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची काहीच गरज नाही, यशोमती ठाकुरांचे सेनेला प्रत्युत्तर
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
