Share

अभिनेत्री रविना टंडन कडून ‘सायना’ चित्रपटाची स्तुती!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. अनेक नामांकित सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू यांच्या आयुष्यावर चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. परंतु या सर्वांमध्ये ‘सायना’ हा चित्रपट अधिक चर्चेत आला आहे. सायना हा चित्रपट प्रसिद्ध टेनिसपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर चांगलाचं आवडला आहे. दरम्यान, आता या आगामी चित्रपटाची स्तुती खुद्द रविना टंडन करताना दिसत आहे. तिनं हा चित्रपट पाहाच अन्यथा खूप चांगली प्रेरणादायी गोष्ट तुम्ही मिस कराल असा सल्ला देखील आपल्या चाहत्यांना दिला आहे.

नुकतंच या चित्रपटाचा एक खास ‘शो’ बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आयोजित केला गेला होता. अन् हा शो पाहून अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. यामध्ये रविना टंडन सर्वात पुढे आहे. “नुकताच सायना हा चित्रपट पाहिला. खुपच सुंदर चित्रपट आहे. सायनाच्या बालपणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं देखील खूप सुंदर काम केलं आहे. परिणितीनं देखील या चित्रपटासाठी जीव तोडून मेहनत केली आहे. हा चित्रपट पाहून प्रेरणादायी अनुभव मिळेल.” अशा आशयाचं ट्विट करुन रविनानं चित्रपटाची स्तुती केली आहे.

खूप दिवसांपासून सायना या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या होत्या म्हणजे चित्रपटात सायनाची भूमिका कोण साकारणार त्या मध्ये बऱ्याचं सेलिब्रिटींना विचारण्यात आले होते. सुरुवातीला अभिनेत्री दीपिका पदुकोणला परंतु तिने काय कारणाने सायना या चित्रपटासाठी नकार दिला त्यानंतर पुढे श्रद्धा कपूरनं या चित्रपटासाठी होकार दिला. तिनं यासाठी तयारी देखील सुरु केली होती. परंतु मग तिनं देखील इतर चित्रपटांसाठी सायनामध्ये काम करण्यास नकार दिला. अखेर या चित्रपटासाठी परिणीती चोप्राची निवड करण्यात आली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यानं केलं आहे. सायना नेहवालचा ऑलंम्पिक पर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!