मुंबई: उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ (Infosys) या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या कराराची माहिती देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या दरम्यान त्यांना संविधानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता.
अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संविधानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी तिच्या या व्यक्तव्यावरुन या पत्रकार परिषदेत चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. उदय सामंत म्हणाले, अभिनेत्री कंगनाला संविधानाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असा टोमणा मारत त्यांनी संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा देखील विचार व्यक्त केला आहे.
उदय सामंत म्हणाले, भारतीय संविधान कशा पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं याबाबत आम्ही समिती नेमत आहोत. संविधानाचा समावेश अभ्यासक्रमात करायचा की स्वतंत्रपणे, याबाबत पुढील शैक्षणिक वर्षापासून ठोस निर्णय घेण्यात येईल. भारतीय संविधान हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने इन्फोसिस सोबत शैक्षणिक क्षेत्रासाठी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ ४० लाख विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रलंबित याचिकेवर १५ डिसेंबरला होणार सुनावणी
- ‘रणवीरच्या वडिलांनी यश राज फिल्म्सला २० कोटी रुपये दिले’ ; KRKचे वादग्रस्त वक्तव्य
- शाळा सुरु करण्याचा निर्णय होल्डवर; महापौरांनी दिली माहिती
- ‘हजारो लोक रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही, पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या’
- कॉमेडीयन मुनावर फारुकीच्या पाठीशी कॉंग्रेस उभी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

