मुंबई : विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते सांगणारा बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) (Kamal R Khan) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. तो नेहमी अनेक कलाकारांवर टीका करताना दिसतो. यातच आता केआरकेने बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) ट्रोल करत त्याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
दरम्यान रणवीर सिंहच्या बॉलिवूड पदापर्णासाठी यशराज प्रोडक्शनला त्याच्या वडिलांनी २० कोटी रुपये दिल्याचं कमाल आर. खान (KRK) यांनी म्हटलं आहे. ‘यशराज फिल्म्सनं (Yash Raj Films) रणवीर सिंहला लॉंच केलं आणि आज तो मोठा स्टार आहे, असं तुम्हाला वाटत असेल. परंतु, आदित्य चोप्रा यांनी रणवीर सिंहला लॉंच केलं नसून, रणवीरला आदित्य चोप्रांच्या माध्यमातून लॉंच करण्यात आलं. रणवीरच्या वडिलांनी आदित्य चोप्रा यांना २० कोटी रुपये दिले होते. त्यानंतर यशराज फिल्म्सनं त्याला लॉंच केलं.’ असं वादग्रस्त वक्तव्य केआरकेने केले आहे.
तसेच कमाल आर. खान यांनी यशराज प्रॉडक्शन अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हा दावा केला असून, या चित्रपटात आदित्य चोप्रा (Anushka Sharma) यांची पत्नी राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशराज प्रोडक्शन हाउसच्या `बँड बाजा बारात`( ‘Band Baja Barat’). या चित्रपटातून रणवीर सिंहने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यात अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील होती. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही पसंती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
- २ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल
- ‘ओमिक्रॉन’ची पुण्यात धास्ती; शिथील झालेले नियम पुन्हा कठोर
- ‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’
- मंत्र्यांच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला… – बच्चू कडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

