पुणे : दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे. ओमिक्रॉन हा व्हायरस अत्यंत घातक असून संपूर्ण देशभर हा व्हायरस पसरण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हणजेच डब्ल्युएचओकडून सांगण्यात आलं आहे. या व्हायरस होणाऱ्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर भारतात आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात अनेक शहरांमध्ये अद्यापही निर्णय घेतला नाही.
एकीकडे गेल्या 2 वर्षापासून ऑनलाईन शाळा सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी होत आहेत. तर दुसरीकडे शाळा सुरु केल्या तर कोरोना आणि आता ओमिक्रॉनच्या नव्या व्हायरसने देशाला धास्ती भरली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले होते.
IMP : पहिली ते सातवीपर्यंत शाळा बंदच राहणार !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून १५ डिसेंबरला एकूणच आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल. पुणेकर पालकांनी याची नोंद घ्यावी. pic.twitter.com/bktFCBwrPf
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 30, 2021
महत्त्वाच्या बातम्या:
- ‘हजारो लोक रस्त्यावर गुपचूप येऊ शकतच नाही, पोलिसांना सूचना दिली होती हे होऊ द्या’
- २ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल
- ‘ओमिक्रॉन’ची पुण्यात धास्ती; शिथील झालेले नियम पुन्हा कठोर
- ‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’


