🕒 1 min read
मुंबई: गेल्या दोन महिन्यात मुनावरचे फारुकी (Munawar Faruqui) १२ शो रद्द झाले आहेत. त्याला उजव्या विचारसरणीच्या गटांकडून धमक्या येत आहेत. बंगळुरू पोलिसांनी कॉमेडियन मुनावर फारुकीच्या शोच्या आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्यास सांगितल्यानंतर, त्याने सोशल मीडियावर लिहिले की, मी हरलो आहे आणि मी भविष्यात कदाचीत शो करणार नाही. त्याच्या या ट्विट नंतर देशभरात या विषयी चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात विशेष म्हणजे कॉंग्रेस (Congress) पक्षाने देखील पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेस पक्षाने (Congress) मुनावरला मुंबईत शो करण्यासाठी आमंत्रित केले आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे नेते अँथनी मॅथ्यूज (Anthony Mathews) म्हणाले की, आम्ही मुनावरशी चर्चा करत आहोत आणि त्यानी पुष्टी केल्यावर अधिकृतपणे तारीख घोषीत करू. मुनवरचा प्रस्तावित कार्यक्रम मुंबईत शांततेत पार पडावा यासाठी ते पोलीसांसोबत कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करतील. ते पुढे म्हणाले की, मुनावरला संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस मदत करेल, असा विश्वास देखील अॅंथनी मॅथ्यूज यांनी दिला आहे.
कॉमेडियन मुनावर फारुकी याने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या एका शोमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली एक महिना तुरुंगात घालवला आहे. मात्र त्याने देवांचा अपमान होईल असं एकही वाक्य वापरलं नव्हतं हे नंतर सिद्ध झालं. त्या नंतरही त्याला कुठेच शो करू दिला जात नाहीये. २८ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमधील मुनावरचा शो शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला कारण शो आयोजित केलेल्या ठिकाणी तोडफोड करण्याची धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता तृणमूल कॉंग्रेस (TMC) नंतर कॉंग्रेस पक्षाने देखील त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती
- ‘२ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ‘मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेमुळे महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशन…’
- ‘MayDay’ सिनेमाचं नाव बदललं ; जाणून घ्या काय असणार नाव?
- मंत्र्यांच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला… – बच्चू कडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
