Share

बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राजला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक….

Published On: 

गोंदिया : गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेरनी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी अभिनेता विजयराज याने हॉटेलमधील ३० वर्षीय महिला कर्मचाऱ्याची छेडछाड केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणामध्ये अभिनेता विजय राजच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंग झाल्याची तक्रार गोंदियाच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर झाला असून विजय राजला पोलिसांनी अटक केली आहे.

हॉटेल गेटवेच्या महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ, ड)अन्वये गुन्हा दाखल करून विजय राज याला अटक केली आहे. याप्रकरणा विषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून हॉटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात येत असून पत्रकारांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!