मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निधि अग्रवालच्या रोमॅण्टिक केमेस्ट्रीने भरलेलं ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणं अखेर रिलीज झालं आहे. या गाणायला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिग्दर्शक फराह खान हिने या गाण्याची कोरिओग्राफी आणि डायरेक्शन केलंय. पंजाबच्या हिरवाईत शूट केलेल्या या गाण्यात प्रेमींची कहाणी दाखवण्यात आली आहे.
या गाण्यात सोनू सूदने एका शेतकऱ्याची भूमिका साकारलीय, जो पुढे जाऊन एक पोलिस अधिकारी बनत असतो. अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचं रीक्रिएटेड वर्जन असलेलं ‘साथ क्या निभाओगे’ सॉंग रिलीज होताच गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याने प्रेक्षकांच्या ९० च्या दशकातील जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे.
या गाण्याविषयी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, ‘हॅपी न्यू इअरमध्ये फराहसोबत काम करण्यापासून ते 1990 च्या दशकात रेडिओवर अल्ताफ राजाची मूळ गाणी ऐकण्यापर्यंत सर्व जुन्या आठवणी या गाण्याने ताज्या झाल्या आहेत. पंजाबमध्ये हे गाणे शूट केल्याने मला घरची आठवण येत होती. मला आशा आहे की आमची मेहनत कामी येईल आणि प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल.’ असे त्याने म्हटले. सोनू सूदच्या या गाण्याची त्याचे चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते.
दरम्यान, सोनूने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने तर लोकांची मने जिंकेलीच पण त्याने केलेली कामे मुळे लोकांनी त्याचे प्रचंड कौतुक केल. कोरोना काळात अनेक गरजूंना मदत पोहोचवण्याचे काम सोनू निःस्वार्थी भावनेने केले. त्याच्यासारख्या व्यक्तीने राजकारणात यावे अशी इच्छा अनेक सेलेब्रीटींनी तसेच सामान्य माणसांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. परंतु यावर त्याने आपला असा कोणताही ही विचार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- आगामी निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना डिपॉझिटही परत मिळणार नाही– माजी मंत्री खोतकर
- …तर जनता तुम्हाला तुमची जागा योग्यवेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही – प्रीतम मुंडे
- ‘महाविकास आघाडी सरकारने मंत्रालयाचे रूपांतर बारमध्ये केले’ ; भाजपचा घणाघात
- आरटीई रकमेबाबत शिक्षक संघटना आक्रमक; दिल्लीतील जंतरमंतरवर केले आंदोलन!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
