Share

मोहन भागवत यांच्या सोबत अभिनेते मिथुन चक्रवर्तीं यांची भेट कौटुंबिक की राजकीय ?

Published On: 

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बॉलीवूड मधील प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती  यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते.

दरम्यान, ही कौटुंबिक भेट असल्याचं मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितलं. खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं. पण आमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हती, असं चक्रवर्तींनी सांगितलं. मोहन भागवत यांनी आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवलं आहे, असंही मिथुन चक्रवर्तींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!