🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी गरजू व्यक्तिना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऋतिक रोशननं असोसिएशनला २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. तर दारिद्र रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देण्यात येणार आहे.
https://www.instagram.com/p/CNNJZo4naDw/?utm_source=ig_embed&ig_rid=b4b456ee-9c58-4767-979e-a55923284eef
अभिनेता ऋतिक रोशन कोरोनाच्या या संकटकाळात गरजू लोकांना पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सोबतच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील, ऋतिकनं सिंटा साठी मदत केली होती. त्यावेळी त्यानं २५ लाखाची आर्थिक मदत केली होती. त्यानं केलेल्या या मदतीमधून सुद्धा ४ हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती.
ऋतिककडून करण्यात आलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानण्यात आले आहेत. याबाबत सिंटाचे महासचिव अमित बहल म्हणाले की, ‘ऋतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती. या वेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या ५००० सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे.’ या मदतीचा फायदा सिंटाच्या ५ हजार सदस्यांना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिला सुखद धक्का, दिग्दर्शकासोबत बांधली लग्नगाठ
- डब्लुटीसी फायनल संदर्भात ‘ब्रेट ली’ची सावध प्रतिक्रीया, म्हणाला…
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
