नवी दिल्ली : ग्रेटा थनबर्ग टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतून कार्यकर्ती दिशाच्या रवीच्या रूपाने पहिली अटक केली. दिशाला कोर्टापुढे हजर केल्यानंतर तिची 5 दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या महिन्याच्या 4 तारखेला दिल्ली पोलिसांनी टूलकिटसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. दिशा रवीने शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट संपादित केली आणि त्यात काही गोष्टी जोडून ती पुढे पाठवल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी मागितला 7 दिवसांचा रिमांड
दिल्ली पोलिसांनी कोर्टामध्ये दिशाचा 7 दिवसांचा रिमांड मागितला होता. ते म्हणाले की, खलिस्तानी संघटनेचे भारत सरकारविरुद्धचे हे एक मोठे षडयंत्र आहे. पोलिसांनी सांगितले की, दिशाने या टूलकिटचे संपादन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नूने प्रभावित आहे. दिशावर 3 फेब्रुवारी रोजी टूलकिट संपादित केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिशाचा मोबाइल जप्त केला आहे, परंतु त्याचा डेटा आधीच डिलीट करण्यात आला होता.
Delhi Police Cyber Cell arrested 21-year-old climate activist Disha Ravi from Bengaluru on 13th February for her alleged role in spreading 'toolkit' related to farmers protest
— ANI (@ANI) February 14, 2021
काय म्हणाली दिशा रवी?
अटक करण्यात आलेली दिशा रवी फ्यूचर कॅम्पेन फॉर फ्रायडेची संस्थापक सदस्या आहे. दरम्यान, दिशाने कोर्टात सांगितले की, तिने टूलकिटच्या केवळ 2 ओळी संपादित केल्या आहेत. ती म्हणाली, ‘अन्नदाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मी हे केले, त्यांच्या आंदोलनाने मी प्रभावित झाले. ते मला अन्न आणि पाणी देतात.’
दिशाने डिलीट केलं स्वत:चं ट्वीटर अकाउंट
अटक करण्यात आलेल्या दिशा रवीने स्वत:चे ट्वीटर अकाउंट डिलीट केलेले आहे. तिच्या या कृतीमुळे तिच्यावरील आरोपांना बळकटी मिळू शकते. दिशावर 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत सायबर स्ट्राइकसाठी डिझाइन केलेले टूलकिट संपादित केल्याचा आरोप आहे. त्यात तिने काही गोष्टी जोडल्या आणि ती किट पुढे पाठवली. या प्रकरणात आणखी काही नावे समोर आली असून लवकरच इतरांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात शांतनु आणि निकिता यांनाही अटक करायची आहे, असे पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मिरात अब्दुल्ला पिता-पुत्र नजरकैदेत, पुलवाम्याला जाण्याची परवानगी नाही
- पुलवामा स्मृतिदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जम्मूतून 7 किलो स्फोटके जप्त
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ‘लव इज इन द एयर’, मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या दिल्या खास शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

