औरंगाबाद : सिल्लोड तालुका हा विकासात जिल्ह्यात सर्वात पुढे आहे. मात्र लसीकरणात आपण सर्वात मागे आहोत. याबाबत खंत व्यक्त करत कोरोना लसीकरण एक राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने त्याला विरोध करणे बेकायदेशीर असून लसीकरण बाबत कोणी अफवा पसरवीत असेल तर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई होईल अशी सक्त ताकिद राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व निर्देशानुसार सिल्लोड सोयगाव मतदारसंघात २ व ३ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या अनुषंगाने रविवार ( दि. २९ ) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील स्वस्तिक लॉन्स येथे सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बाबत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पहिल्या टप्यात ५० हजार जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून येत्या २ महिन्यात तालुक्यात १०० टक्के लसीकरण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दोन दिवसीय लसीकरण मोहिमेतील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने एक टीम म्हणून काम करीत मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत दिले. कोरोना पासून सुरक्षित रहायचे असेल तर लस हे एकमेव प्रभावी पर्याय आहे.
कोरोनाच्या लढाईत लस एक संरक्षण कवच असल्याचे मत व्यक्त करीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नागरिकांनी दोन दिवसीय अभियानात सहभागी होवून १८ वर्षावरील प्रत्येकाने या दिवशी लस घ्यावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरीकांना केले आहे. कोरोना लसीकरण हे एक राष्ट्रीय कार्यक्रम असून विविध पक्ष, सामाजिक संघटनेने या कार्यक्रमात सहभागी होवून लसीकरणाबाबत जनजागृती करीत पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना सत्तार यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परबांना ईडीची नोटीस ; संजय राऊत म्हणाले, ‘ शाब्बास !…’
- मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस
- सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल
- भाजप परभणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंच्या गाडीवर हल्ला, कारवाईची मागणी
- ‘माझ्या नावात पटेल; सगळ्यांना पटेल अशीच कामे मी करणार’, प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल यांची ग्वाही!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

