🕒 1 min read
पटना: आता सोशल मीडियावर राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणे महागात पडणार आहे. कारण आता बिहार मध्ये सरकारने एक फर्मान काढला आहे यामध्ये सोशल मीडियावर राजकीय नेते तसेच अधिकार्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश बिहार पोलिस ADG कडून एक पत्र जारी करून देण्यात आले आहेत.
या पत्रांमध्ये सोशल मीडियावर सरकार, मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बद्दल अपमानजनक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्यास सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र सध्या बिहारमध्ये यावरून राजकारण सुरू झाले आहे.
60 घोटालों के सृजनकर्ता नीतीश कुमार भ्रष्टाचार के भीष्म पितामह, दुर्दांत अपराधियों के संरक्षकर्ता, अनैतिक और अवैध सरकार के कमजोर मुखिया है। बिहार पुलिस शराब बेचती है। अपराधियों को बचाती है निर्दोषों को फँसाती है।
CM को चुनौती देता हूँ- अब करो इस आदेश के तहत मुझे गिरफ़्तार।???? https://t.co/wDJfoMqgjT
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) January 22, 2021
आरजेडी ने यावरून सरकारवर सोशल मीडिया ला घाबरत आहे. ‘सरकार जाहिरातींच्या माध्यमातून आपला अजेंडा साध्य करत आहे. तर खऱ्या बातम्यांना दाबत असल्याचा’ आरोप केला आहे. त्याचबरोबर तेजस्वी यादव याने देखील सोशल मीडियावर ट्विट करत, ‘ नितीशकुमार यांनी ६० घोटाळे केले आहेत, आरोपींचे ते रक्षण करतात, तर पोलीस देखील दारू विकतात आणि निर्दोषी ना अटक करतात असा आरोप केला आहे. ‘ तर मी आता असे बोलल्यानंतर मला देखील अटक करा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल खूप सन्मान आहे’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- नागपुरमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; नाराज शिवसैनिकांचे पक्षप्रमुखांना पत्र
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
