Share

उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर उस्मानाबादेत कारवाई

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे तसेच राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोख्ण्यासाठी कडक नियमांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरी देखील अनेक लोकं नियमांचं पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. दुकाने देखील उघडी ठेवण्यात येत आहेत. अशांवर तुळजापूर नगरपालिकेने कारवाई केली आहे. संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी नागपालीकेने स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत दुकाने उघडी ठेवल्याप्रकरणी तुळजापूर नगरपालिकेने गुरुवारी (दि. २०) तीन तर शुक्रवारी चार दुकानांवर कारवाई केली. जागतिक महामारी कोरोनाच्या निर्मुलनासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा आदेशाने जिल्ह्यात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल तसेच कृषीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी शहरात अनेक दुकाने छुप्या पद्धतीने उघडी ठेवण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

या प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करत उस्मानाबाद राज्य रस्त्यावरील सन सिरॅमिक व जिजाऊ ग्लास आणि भवानी रोड वरील आष्टगे क्लाॅथ सेंटर आदी दुकाने सील केली. पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे, कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये या साठी नियमांचे पालन तसेच संचारबंदीमध्ये विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन येथील प्रशासन करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!